दोषी अधिकार्यांवर कारवाई करणार
येरवडा :- घोरपडी भागात काही दिवसापूर्वी पालिका बांधकाम विभागाच्या वतीने अनधिकृतपणे केलेल्या बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. यावर पालिका अधिकारी काही ठोस उपाययोजना करत नसल्याचे निदर्शनास येताच राष्ट्रीय परिवर्तन संघटनेचे संस्थापक राकेश वाल्मिकी वाल्मिकी पालिकेसमोर 20फेब्रु. रोजी पालिकेसमोरउपोषणास बसले होते. यादरम्यान पालिकाआयुक्त कुणाल कुमार यांनी दोषी अधिकार्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच वाल्मिकी यांनी पाणी पिऊन उपोषण मागे घेतले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी वासुदेव डावरे,सिद्धार्थ कांबळे,नंदा यादव,मंगल हरपळे ,भीमसेन कांबळे उपस्थित होते. याविरोधात सर्वात प्रथम दै. जनशक्ती वृत्तपत्रानेह्या घटनेची दखल घेऊन वृत्त प्रसिध्द् केल्याने वाल्मिकी यांच्यासह पदाधिकार्यांनी देखील जनशक्तिचे विशेष आभार मानले.
पालिका धिकार्यांना दिले होते निवेदन
पालिकेच्या वतीने परिसरात पूरपरिस्थी निर्माण होऊ नये या उद्देशाने परिसरात पावसाळी लाईन टाकण्यात आली आहे. मात्र येथील काही सोसायटी धारकांनी ड्रेनेज लाईन पावसाळी लाईनला जोडल्या होत्या. याविरोधात देखील वाल्मिकी यांनी आवाज उठविला होता. या दोन्ही संदर्भात पालिकेच्या अधिकार्यांना वारंवार निवेदन देऊन ही अधिकार्यांनी नागरिकांच्या मुख्य समस्येला केराची टोपली दाखवली होती. पावसाळी लाईनमधील असणारे सांडपाणी हे ढवळे वस्ती आदी भागात उघड्यावर येत असल्याने नागरिकांना ऐन हिवाळ्यात दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. यामुळे नागरिकांचा असलेला आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात बनला होता.