जळगाव । शहरातील धोकेदायक इमारतींचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण पूर्ण करून संबधित इमारत मालकांना इमारतींची दुरुस्ती किंवा पाडण्यासंबधी नोटीस देण्याची सूचना आयुक्त जीवन सोनवणे यांनी बांधकाम विभाग अभियंत्यांना दिल्या आहेत. मान्सूनच्या पाश्वभूमीवर मनपा आयुक्तांच्या दालनात मनपातील सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत मान्सून आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या बैठकीत उपायुक्तांसह, सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शहरात सुरू असलेल्या नालेसफाईचा आढावा घेण्यात आला. यासह अतिक्रमण, गटारी साफसफाई, खड्डे याचीही माहिती आयुक्तांनी घेतली.मनपाकडून सुरू असलेल्या मान्सून पूर्व नालेसफाईची मुदत 20 मे पर्यंत आयुक्तांनी दिली आहे. ही मुदत शनिवारी संपणार आहे. यासह प्रत्येक वार्डातील गटारी सफाईंच्या कामांचादेखील आढावा या बैठकीत घेण्यात आला.