आयुक्तालयाने सोशल  मिडीयावर अ‍ॅक्टीव व्हावे

0
पिपरी : पोलीस आयुक्तालय सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. तरी अद्याप शहरातील तसेच आयुक्तालय हद्दीतील नागरिकांना आयुक्तालयाबाबत माहिती नाही. सध्या शहरात सोशल मीडियाचा वापर जवळपास प्रत्येकजण करतो. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाने फेसबुक, व्हाट्स अप, ट्विटर यांसारख्ख्या सोशल मीडियाच्या माध्यामातून नागरिकांशी संवाद वाढवावा. त्यातून नागरिकांच्या सूचना, हरकती पोलीस प्रशासनाकडे लवकरात लवकर पोहोचतील, अशी मागणी शहरातील आयटीयन्स आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. हिंजवडी आणि शहरातील काही भागात वाहतूक शाखेकडून अचानक बदल केल्यामुळे नागरिक निश्‍चित केलेल्या वेळेत इच्छित स्थळी पोहोचू शकत नाहीत. सामाजिक संघटना यासाठी पोलिसांना सहकार्य करू शकतात, परंतु पोलीस आणि सामाजिक संघटना यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण व्हायला हवा.