जळगाव । शासकिय तंत्रनिकेतन माजी संघटना व गोदावरी अभियांत्रिकीतर्फे जळगाव म.न.पा आयुक्त जिवन सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा डॉ उल्हास पाटील हे होते. गोदावरी इग्लीश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गित सादर केले.सिध्दार्थ नेतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहूण्यांचा परिचय करून दिला. डॉ जानकीराम तळेले व माजी खा डॉ उल्हास पाटील यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांचा सपत्नीक पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ देउन सत्कार केला.
अधिकारी मित्र असल्याचा गर्व
बोदवडचे तहसिलदार भाउसाहेब थोरात, आयुक्ताचे मोठे भाउ निवृत्त वनअधिकारी उदय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला भावनिकपणे उत्तर देतांना आयुक्त सोनवणे यांनी त्यांच्या आयुष्यातील हा सुवर्णक्षण असून जून्या मित्रांनी केलेला सत्कार प्रेरणादायी असल्याचे सांगत आपल्या आयुष्यातील अनूभव विषद केला. माजी खा डॉ उल्हास पाटील यांनी आयुक्त सोनवणे यांच्या जिवनावर प्रकाशझोत टाकत विविध चांगल्या कार्याची माहिती उपस्थीतांना देतांना असा अधिकारी आपला मित्र असल्याचा गर्व आहे असे सांगीतले.
माजी विद्यार्थ्याची सह परिवार उपस्थिती
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ अशोक.पी. चौधरी यांनी केले. कार्यक्रमाला जळगाव परिसरातील विविध पदावरी कार्यरत असलेले शासकिय तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी सहपरिवार उपस्थीत होते. गोदावरी इस्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्चचे डॉ प्रशांत वारके,गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ व्ही जी अरजपूरे, उपप्राचार्य प्रविण फालक यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी गोेदावरी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.