निवडीनंतर कर्मचार्यांचा ऑर्डनन्सच्या प्रवेशद्वाराबाहेर केला जल्लोष
भुसावळ- ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार यूनियनचे महासचिव दिनेश राजगिरे यांची आयुध निर्माणी बोर्ड कलकत्ताच्या जेसीएम- 3 या पदावर नियुक्ती आदेश येथे प्राप्त झाल्याने ऑडर्नन्सच्या कर्मचार्यांनी सोमवारी प्रवेशद्वारावर जल्लोष करीत राजगिरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाच्या (एआयडीईएफ) च्या वतीने राजगिरे यांचे नामांकन करण्यात आले होते.
नवीन दिशा देण्याचे काम करणार -राजगिरे
देशातील 41 आयुध निर्माणीतील विविध प्रकारच्या समस्या निकाली काढण्यासाठी जेसीम- 3 हे महत्वपूर्ण फोरम आहे. भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील वर्कलोड व भविष्य पाहता जेसीएम- 3 पदाच्या माध्यमातून कर्मचारी पॉलिसी मॅटर तसेच नवीन उत्पादनास प्राधान्य देवून निर्माणीला नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राजगिरे यांनी सत्कारप्रसंगी दिली.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
राजगिरे यांच्या निवडीनंतर ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार यूनियन, एससीएसटी ओबीसी असोशिएशनसह ऑर्डनन्स फॅक्टरीतील सर्व युनियन असोसिएशनने राजगिरे यांचे स्वागत केले. प्रसंगी ऑर्डनन्सचे सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय संरक्षण कामगार महासंघाचे महासचिव सी.श्रीकुमार व उपाध्यक्ष तथा कामगार नेते राजेंद्र झा यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.