आयुध निर्माणी कर्मचार्‍यांची निदर्शने

0

भुसावळ । राष्ट्रीय सुरक्षा कर्मचारी महासंघातर्फे अलाहाबाद येथे संपन्न झालेल्या त्रिवार्षिक अधिवेशनात घेतलेल्या निर्णयानुसार भारत सरकारच्या केंद्रीय कर्मचारी विरोधी नीति विरोधात आणि आपल्या न्यायिक मागण्या मान्य होण्यासाठी संपुर्ण देशात अखिल भारतीय मागणी सप्ताह 24 ते 29 एप्रिल पर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे. यात एक दिवस मागण्यांचे प्रचारपत्रक वितरण, काळ्या फित लावणे, घोषणाबाजी करणेे, द्वारसभा तसेच एक दिवसीय विशाल धरणे करण्यात आले. या मागणी सप्ताहात प्रमुख मागण्यांमध्ये संरक्षण क्षेत्रात खासगीकरण न करणे, संरक्षण क्षेत्रात 100 टक्के एफडीआयचा निर्णय परत घेण्यात यावा, नविन भर्ती लवकरात लवकर करणे, रविवार ओव्हरटाईम बंद करणे व सुट्टीच्या बदल्यात ओव्हरटाईम न करणार्‍याचा आयुध निर्माणीचा निर्णय परत घ्यावा, नविन पेंशन योजना बंद करुन जुनी पेंशन चालू करण्यात यावी, सातव्या वेतन आयोगात सुधारीत वेतनमान देण्यात यावा, घर भाड्यात कटोती न करणे, विविध भत्ते आणि आणि अग्रीमबाबत सकारात्मक निर्णय लगेच करणे अशा विविध मागण्यांसाठी आयुध निर्माणी मजदूर युनियन इंटकतर्फे आंदोलन करण्यात आले.

वरणगाव येथे निदर्शने
येथील इंटक युनियनतर्फे मागणी सप्ताह संपन्न होत आहे. गेटसमोर घोषणा देणे, धरणा आंदोलन, मोटारसायकल रॅली व महाप्रबंधक यांना निवेदन देणे या मार्गाने आंदोलन सुरु आहे. 7 व्या वेतन आयोगातील भत्ते मिळावे, खाजगीकरण बंद करावे, अनुकंपा भरती करावी, अप्रेंटीसला नोकरी मिळावी, या प्रमुख मागण्या आहेत.

यांचा होता सहभाग
यामध्ये द्वारसभा घेण्यात येऊन धरणे आंदोलन करण्यात आले. आयएनडीडब्ल्यू फेडरेशनचे संघटन सचिव सच्चानंद गोधवाणी यांनी मार्गदर्शन केले. युनियनचे अध्यक्ष सुभाष अत्तरदे, महासचिव किशोर चौधरी, कार्याध्यक्ष याकूब तडवी, रामा महाजन, गणेश चौधरी, एम.एस.राऊत, एस.एच. बिंद्रा, के.बपी. बाविस्कर, विक्रम अन्नदाते, धनराज मानकर, चेतन चौधरी, बापू जंगले, संजय साळुंके, किशोर माळी, वसिम खान, निलेश पाटील, विजेंद्र झांबरे, गणेश महाजन, बहुजन सुरक्षा कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुनिल मोरे, महासचिव संजय अहिरे, अजय तायडे, एम.डी. वानखेडे, राहुल पाटील, विजय साळुंके, अशोक ठाकुर यांनी सहकार्य केले.

वरणगाव येथे यांनी घेतले परिश्रम
आंदोलन यशस्वीतेसाठी महासचिव महेश पाटील, अध्यक्ष रवी देशमुख, सुधीर निकम, सुधीर गुरचळ, कमलेश सिंग, सुरेश पवार, महेश देशमुख, जयश्री झोपे, दिपक पाटील, सुरेश चौधरी, निलेश घुले, विकास दांडेकर व इंटक कार्यकारीणी परिश्रम घेत आहे.