झोप येत नाही म्हणून जंग जंग पछाडतो…झोपेच्या गोळ्या घेतो…व्यसनेही करतो…बुवा-महाराजांच्याही लोटांगण घालतो. झोप का लागत नाही या आपल्यासाठी दैवी ठरलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र विज्ञानाने दिलंय मानसशास्त्रीय अभ्यासातून. आयुष्यात निश्चित ध्येय नसलेल्या माणसाला शांत झोप लागत नाही, असे या अभ्यासाने दाखवून दिले आहे.
मनोवैज्ञानिकांसमोर ड्रग्ज न घेता झोपेसाठी काय करता येईल, असा प्रश्न होता. त्यासाठी ८२३ लोकांचा अभ्यास करून झोपेसंबंधातील निष्कर्ष काढण्यात आले आहेत. नमुन्यासाठी घेतलेले लोक साधारणतः ६० ते १०० वयोगटातील होते. ७७ टक्के महिलांचा समावेश त्यात होता. हा अहवाल सर्व वयोगटांना लागू होतो. झोप न लागण्याची समस्या त्या माणसाला हवी इतकंच, असं मनोवैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
नमुन्यांमधील ६३ टक्के लोकांना वाटत होते की त्यांच्या आयुष्याला अर्थ आहे. त्यांना चांगली झोप लागत होती. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांना १० प्रश्न जीवनाच्या ध्येयासंबंधात विचारले होते तर ३२ प्रश्न झोप कशी लागते यावर विचारले होते. दोन्हीमधील अन्योन्य संबंध गणितीय व संख्याशास्त्रीय पद्धतींनी सिद्ध करण्यात आला.
झोप येण्यासाठी आता लोकांना आयुष्याचा हेतू कसा विकसित करावा यासाठी मदत करावी लागणार आहे. जेसन आँग हे न्यूरॉलॉजीचे तज्ज्ञ फिनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये संशोधन करीत आहेत. अनिद्रेचे बळी पडत असलेल्यांना काहीही करायचे नाही फक्त सजगता (माईंडफुलनेस) तंत्राचा अवलंब करायचा हे असे आँग सूचवतात.
अनिद्रा विकाराला जस जसे वय वाढत जाते तस तशी सुरूवात होते. असे लोक कोटीच्या संख्येने आहेत. सर्वांवर औषधांचा मारा करणे मुळीच योग्य नाही. आता झोप न लागण्याचे कारण समजलेय. पुढील काम सजगता शिकण्याचे व शिकवण्याचे आहे, असे या अभ्यास अहवालाचा लेखक अर्लेनेर टर्नर म्हणतो.
झोप लागायला त्रास होणे, अतिदीर्घकाल झोप लागणे, दिवसा झोप येणे अशी अनिद्रेचीच किंवा निद्रानाशाचीच लक्षणे आहेत. यात श्वासाची कमी लांबी, थांबत थांबत श्वास चालणे अशी लक्षणेही आहेत. रेस्टलेस लेग सिंड्रोमची बाधाही निद्रानाशामुळे जडते. यात पायात वेदना आणि पाय हालवत बसण्याची अनिवार उर्मी अशी लक्षणे असतात.
या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल ऑफ स्लीप सायन्स अँड प्रॅक्टीसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.