अमळनेर । पतंजली योगपीठ हरिद्वारतर्फे अमळनेर तालुक्यातील धानोरा गावात पाच दिवसीय योग शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात पतंजली योग पिठाचे जळगाव जिल्हा योग प्रचारक कमलेश आर्य यांनी योगदान दिले. त्यानी शिबिरार्थीना योगासने करुन दाखवले त्याचबरोबर त्याच्याकडून सराव देखील करून मुला – मुलींना योगासने, आरोग्य, संस्कार याविषयी देखील माहीती देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीमुळे व धावपळीच्या युगात आपले आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी त्याचबरोबर आयुष्य वाढवण्यासाठी प्रत्येकाने रोज योगासने केली पाहिजे, असे देखील योग प्रचारक आर्य यांनी सांगितले.
उपस्थितांना दिले योगासनाचे धडे
जिल्हा भरात ठिक ठिकाणी योग शिबिर घेण्यात आले त्याला नागरिक तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे. भविष्यात संपूर्ण जिल्ह्यात योग शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचा माणस असल्याचे देखील सांगण्यात आले. मागे 21 जुन रोजी योग दिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या योग शिबिरात आमदार स्मिता वाघ, माजी जि.प. सदस्य अॅड.व्ही.आर.पाटील, महिला पतंजली तालुका प्रभारी रत्नाताई भदाणे, महामंडलेश्वर परमादर्श आचार्य स्वामी हंसानंद तीर्थ महाराज, स्वामी रामानंद महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाशजी सह योग शिक्षक त्याचबरोबर धार, बोहरा, निम, धानोरा आदी गावातील नागरिक उपस्थित होते.