आय पी एल ऑक्शनेर ह्यू एडमीड्स अचानक जमिनीवर कोसळले आहेत. यामुळे लिलाव थांबवण्यात आला आहे.त्या एका श्रीलंकेच्या खेळाडूचा लिलाव लावत होते. त्यांना नक्की काय झाले आहे. हे लवकरच समजेल. त्यांनी आटा पर्यंत २५०० ऑकक्षनचे सूत्रसंचालन केले आहे. ते ६० वर्षाचे आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत टी-२० क्रिकेट लीग म्हणजेत आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस आहे. यावेळी, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत. बंगळुरू येथे आज आणि उद्या रंगणाऱ्या या महालिलावात एकूण ५९० खेळाडू आपले नशीब आजमावताना दिसतील.
बंगळुरूने श्रेयस अय्यरसाठी बोली लावली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनेही मोठी बोली लावली.अखेर केकेआरने म्हणजेच कोलकत्ताने १२.२५ कोटींमध्ये अय्यरला संघात घेतले.
मिस्टर आयपील सुरेश रैना यंदाच्या मोसमात धक्कादायक रित्या अनसोल्ड खेळाडू ठरला आहे.
अष्टपैलू वेस्ट इंडिज खेळाडू डीजे ब्रावो म्हणजेच ड्वेन ब्राव्होसाठी चेन्नई सुपर किंग्जने बोली लावली होती. ४.४० कोटी देत सीएसकेने त्याला संघात घेतले.
नुकताच भारतासाठी खेळलेला अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डाला लखनऊ संघाने ५.७५ कोटींची बोली लावत संघात घेतले.