जळगाव। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसे शिकवावे व त्याच्या गुणवत्तेला प्राधान्य कसे मिळेल आणि ‘आय स्कीम’चे उददेश कशा प्रकारे अमलात आणावे यासाठी गोदावरी अभियात्रिकी व पॉलीटेक्नीकच्या सयुक्त विद्यमाने कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. जागतिक उद्याोगामध्ये जे नवीन तंत्रज्ञान अमलात आणले जाते अशा अभ्यासक्रमांची गरज ही पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असून केवळ कागदी अभियंता न घडवता सक्षम शिक्षण व नोकरी यांचा परस्पर संबंध जोडून आणण्याचे काम पॉलीटेक्नीकच्या नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुबंई नवीन ‘आय स्कीम’च्या माध्यमातून करत आहे.
गोदावरी अभियांत्रिकीत कार्यशाळेचे आयोजन
भविष्यातील रोजगार संधी बघता कागदी अभियंता उपयोगाचा नसल्याचे लक्षात घेउन तंत्रशिक्षण मंडळाने दोन वर्षापासून अभ्यास करुन बदल करण्यात पुढाकार घेत अंतीम सुधारीत उद्योग सुसंगत म्हणजे इंडस्ट्रीयल योजना या वर्षापासून अमलात आणली आहे. गोदावरी अभियांत्रिकीत ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शासकिय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ए.टी.बारी, कार्यक्रम समन्वयक प्रा.के.पी अकोले, प्रा.आर.एम.नाफडे, प्रा.एस.डी.राठोड, प्रा.एस.बी.जोशी, प्राचार्य डॉ.व्ही.जी अरजपूरे, प्रा.के.व्ही.धांडे, किशोर ढाके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रायार्य ए.टी बारी यांनी आय स्कीमच्या गरजेवर लक्ष केंद्रीत केले तर कार्यक्रम समन्वयक प्रा के पी अकोले यांनी आय स्कीमच्या नवीन अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. कार्यशाळेत विविध तंत्रनिकेतनचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.