जळगाव: शहरातील रामानंदनगर परिसरातील आरएमएस कॉलनी येथे ज्योती लिलाधर तायडे यांचे घर फोडून चोरट्यांनी दहा हजारांची रोकड तीस हजारांच्या साड्या व दागिने असा ऐवज लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे.
आरएमएस कॉलनीत ज्योती तायडे दोन मुलांसह या वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे . आठ दिवसांपासून तायडे ह्या त्यांचे आशाबाबा नगर येथील सासरच्यांकडे साफसफाईच्या कामासाठी गेल्या होत्या. गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्या आरएमएस कॉलनीतील घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. व घरातील डब्यात ठेवलेली दहा हजाराची रोकड तसेच तीस हजारांच्या विक्रीसाठी आणलेल्या नव्या साड्या व तीन ग्रॅमचे दागिने व दोन भाराचे जोडवे असा ऐवज लांबविला असल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती त्यांनी रामानंदनगर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक रवींद्र पाटील व पोलिस नाईक शिवाजी धुमाळ यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.