प्रयागराज- प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु आहे. त्याठिकाणी राम मंदिरावरून संत आणि हिंदू संघटनांमध्ये विचार मंथन सुरु आहे. कुंभमेळ्यात १५ कोटी भाविक जमले आहे. दरम्यान आरएसएसने मोदी सरकारला २०२५ पर्यंत तरी राम मंदिर बनेल का? असा प्रश्न केला आहे. संघाचे कार्यवाहक भैयाजी जोशी यांनी प्रयागराज येथे जाहीर कार्यक्रमात बोलतांना राम मंदिराविषयी भाष्य केले.
भारत महासत्ता बनण्यावरून देखील भैयाजी जोशी यांनी व्यंगात्मक भाष्य केले. पुढील १५० वर्ष तरी भारत महासत्ता होणार नाही असे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये राम मंदिराची निर्मिती झाल्यास देश अधिक प्रगती करेल असेही भैयाजी जोशी यांनी यावेळी सांगितले.