आरएसएसच्या सदस्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार; सुरक्षा रक्षक ठार

0

किश्तीवार: जम्मू-काश्मीरमधील किश्तवार येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य चंद्रकांत शर्मा यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. चंद्रकांत शर्मा हे जिल्हा रुग्णालयातील मेडिकल असिस्टंट म्हणून काम करतात.

किश्तीवारमधील एका रुग्णालयात ओपीडीमध्ये असताना बुरखा परिधान करून काही दहशतवादी हॉस्पिटलमध्ये घुसले. ओपीडीमध्ये येऊन या दहशतवाद्यांनी चंद्रकांत यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यात चंद्रकांत गंभीर जखमी झाले तर त्यांचा बॉडीगार्ड जागीच ठार झाला. गोळीबारानंतर बॉडीगार्डकडील शस्त्र घेऊन हे दहशतवादी पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.