शिंदखेडा– देशात सर्वत्र कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिंदखेडा, निरामय फाउंडेशन व जी.एम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीई एकूण 35 कीट वाटप करण्यात आले.
सदर पीपीई कीट हे शिंदखेडा शहर तसेच तालुक्यातील नरडाणा, चिमठाणे, विरदेल, चिरणे- कदाणे, होळ, विटाई, धांदरणे, बेटावद सह आदी गावात आर एस एस चे तालुका संघचालक हितेंद्र जैन, जिल्हा सेवा प्रमुख विजय चौधरी, जि प सदस्य संजीवनी सिसोदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी तालुका कार्यवाह विनोद जाधव, सहकार्यवाह गौरव ठाकूर, ता. सेवाप्रमुख अमोल भगवान मराठे, मयुर पवार, ता.शारिरीक प्रमुख केशव माळी, गजानन बोरसे, शुभम माळी, योगेश माळी, शिवप्रसाद पाटील, सतिष माळी, योगेश बाविस्कर उपस्थित होते.