‘आरटीओ’कडून क्रमांकाची नवीन मालिका

0

पिंपरी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेमधील आपल्या पसंतीचा क्रमांक चारचाकी वाहनासाठी हवा असल्यास ग्राहकांना तीनपट शुल्क भरावे लागणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आपल्या वाहनासाठी आकर्षक क्रमांक किंवा लकी क्रमांक मिळविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. त्यासाठी निश्‍चित केलेले शासकीय शुल्क भरण्यास ते तयार असतात. पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेमधील आपल्या पसंतीचा क्रमांक दुचाकीऐवजी चारचाकी वाहनासाठी पाहिजे असल्यास आता निश्‍चित केलेल्या शुल्काच्या तीनपट शुल्क भरून सदरचा क्रमांक घ्यावा लागणार आहे.