आरपीआयतर्फे लोणावळ्यात धिक्कार मोर्चा

0

आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ

लोणावळा : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ येथे एका कार्यक्रमा दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ लोणावळा शहरात रिपब्लिकन पक्षाच्यावतीने रविवारी धिक्कार मोर्चा काढण्यात आला. गवळीवाडा येथील कुमार चौक ते भाजी मार्केट चौकादरम्यान हा पायी मोर्चा काढण्यात आला. रामदास आठवले यांना धक्काबुक्की करणार्‍या युवकांवर कडक कारवाई करावी, तसेच ज्या ठिकाणी आठवले यांचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमावा या मागण्यांचे निवेदन लोणावळा शहर पोलिसांना देण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, महिला आघाडीच्या अध्यक्षा यमुना साळवी, लोणावळा शहर रिपाइंचे अध्यक्ष कमलशिल म्हस्के, नगरसेवक दिलीप दामोदरे, जिल्ह्याचे नेते गणेश गायकवाड, संजय आडसुळे, धम्मरक्षित जाधव, मालन बनसोडे, तुपेल शेख, राजु देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते