आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा; मोदी सरकारला झटका

0

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद सोडतो आहे असे उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरबीआय आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद सुरू आहेत. हा वाद सुरू असतानाच आज, आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. आरबीआयमध्ये गव्हर्नर पदावरा काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती असेही उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. तसेच आपण आपल्या पदाचा त्वरित राजीनामा देत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मोदी सरकारसाठी हा मोठा झटका मानला जातो आहे.