नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेनी आपले पहिले द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केले. यात आरबीआयने रेपो रेटमध्ये कुठलाही बदल केला नाही. रेपो रेट 6.25 टक्के इतका असणार आहे.
व्याजदरात बदल करण्यापूर्वी नोटाबंदी आणि महागाई दराच्या वाढीचा काय परिणाम झाला आहे याचा अभ्यास केला जाईल, असेही आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी यावेळी म्हटले. याआधी रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के होता. यामध्ये वाढ करण्यात आली असून रिव्हर्स रेपो रेट 6 टक्के करण्यात आला आहे. नोटाबंदीनंतर दोन महिने चलन तुटवडा होता. नंतर चलन पुरवठा योग्य रित्या होऊ लागला होता. परंतु पुन्हा एकदा रोख रकमेचा तुटवडा जाणवतोय. रिव्हर्स रेट वाढवल्यामुळे बाजारात भांडवल वाढेल तसेच चलन तुटवड्याची तीव्रता भासणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.