आरमार्क दि फोर्ट मॅरेथॉनमधून दिला ‘सेव्ह फोर्ट्स, सेव्ह हेरीटेज’चा संदेश

0

जुन्नर । दिवंगत गिर्यारोहक कै. रमेश गुळवे यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेली आरमार्क दि फोर्ट मॅरेथॉन नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात पार पडली असल्याची माहिती समन्वयक श्रीहरी तापकीर यांनी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून सेव्ह फोर्ट्स, सेव्ह हेरीटेज हा दुर्गसंवर्धनाचा संदेश देण्यात आला, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी दिली.

पाच गटांत झाली स्पर्धा
ही मॅरेथॉन स्पर्धा पाच गटांत झाली. यामध्ये पुरुष खुल्या गटात विशाल माढे व सुहास बनकर, अमित केसरकर व तेजस पवार, दिपक चौधरी व बबन चव्हाण, हौशी पुरुष गटात सुशांत गोरीवाले व सिध्देश कणसे, स्नेहदीप घोडशे व प्रतिक काष्ठे, लहू केसकर व भिवा झिटे, हौशी संमिश्र गटात प्रणय वाठारी व शिल्पा केंबळे, अभिजीत बुरटे व सुषमा खरात, सिध्देश्‍वर सुरडकर व निवृथा धारवड, महाविद्यालयीन पुरुष गटात ऋषिकेश देवकर व ज्ञानेश्‍वर गुडगुंडा, अजय पारधी व आशुतोष पाणसरे, अमित भोईर व कृष्णा बोराडे, महाविद्यालयीन संमिश्र गटात मयुर शिंदे व पुनम बुट्टे पाटील, विद्या पाटेकर व अरूण गोडे, निलम भालचिम व रेवणसिध्दा कालेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वीतीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला.

विजेत्यांचा सत्कार
विजेत्या संघाना सन्मानचिन्ह, रोख बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या प्रत्येक स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. महेश पाटील, अर्जुन म्हसे, अरुण बोर्‍हाडे, योगेश गवळी, यश मस्करे, रमेश खरमाळे, संतोष वाघ, गुळवे कुटुंबीयांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी पूनम वाघ, नितीन थोरवे, सुनिल मिंढे, बंडोबा भोर, बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. सुनिल कदम आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

मॅरेथॉनचा मार्ग खडतर
पुण्यातील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेमार्फत दरवर्षी ही स्पर्धा वेगवेगळ्या किल्ल्यांवर भरविण्यात येते. या स्पर्धेसाठी पुणे, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, नगर या जिल्ह्यातून सुमारे 72 संघ सहभागी झाले होते. खुल्या गटातील स्पर्धकांस सुमारे 18 किलोमीटर मार्गक्रमण करायचे होते. किल्ल्याच्या पायथ्याचे कुसूरगाव ते जुन्नरमार्गे तुळजाभवानी लेणी व किल्ल्यास वळसा घेऊन पुर्ण किल्ला चढून उतरणे, असा खडतर मार्ग होता.