मुंबई । तिसर्या कसोटीमध्ये झालेली खांद्याला झालेली दुखापतीतून अजूनही भारताचा कर्णधार व आरसीबीचा कर्णधार विराट कोहली सावरला नाही आहे.त्यामुळे तो आयपीएल 10मधील सुरवातीचे काही सामने खेळू शकणार नाही असे सांगण्यात येत आहे.त्यामुळे आरसीबीचे मुख्यप्रशिक्षक यांनी सांगितले की जर विराट कोहली खेळू शकला नाही तर त्यांच्या जागी एबी डिव्डिलियर्स नेतृत्व करेल असे सागितले.
बंगळुरुची टीम अडचणीत
आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम काहीशी अडचणीत आहे. कारण आरसीबीचा कर्णधार विराट कोहली अजूनही फिट नाही. त्यामुळे तो सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे.जर विराट पहिल्या काही सामन्यांत खेळू शकला नाही तर एबी डिव्हिलियर्स संघाचं नेतृत्त्व करेल, असे आरसीबीचे हेड कोच डॅनियल व्हेटोरी यांनी सांगितले.कोहली 2 एप्रिलला संघासोबत येईल. त्यानंतर मेडिकल स्टाफ याबाबतचा निर्णय घेईल.भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे कोहली शेवटच्या चौथ्या कसोटीत खेळू शकला नव्हता.ही कसोटी भारताने 2-1 अशी जिंकली होती.दरम्यान डिव्हिलियर्सही 2 एप्रिलपासूनच संघात सहभागी होईल. सध्या तो मोमेंटम वन डे चषकाच्या फायनलमध्ये व्यस्त आहे.विराटनंतर डिव्हिलियर्स हा आरसीबीचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.