आरोग्य अधिकार्‍यांची मक्तेदारांवर दंडात्मक कारवाई

0

जळगाव। शहरात आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या पथकाने युनीट क्र. 10च्या कार्यालयाची तपासणी सकाळी 6.45 वाजता तपासणी केली असता तेथे 18 कामगार गैरहजर असल्याचे त्यांना आढळून आले असता त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केली.

वार्ड क्र. 3चा सफाईचा मक्ता परिश्रम महिला बचत गटाला देण्यात आला आहे. तेथे तपासणी केली असता त्यांनी कचरा वाहतूक करतांना झाकलेला आढळून आला नाही. तसेच अमर चौक मधील यशोधन क्लासेस या ठिकाणातील गटारीची साफ सफाई केलेली नसल्याने त्यांना 2 हजार 500 रूपयांचा दंड करण्यात आला आहे. दूपारी वार्ड क्रं. 28 मध्ये पथकाने तपासणी केली असता वृदांवन महिला समाज विकास बहुउद्देशीय संस्थेवर 5 हजार रूपयांचा दंड करण्यात आला. पथकात मुख्य स्वच्छता निरीक्षक ए. एन. नेमाडे, एस. पी. अत्तरदे, आरोग्य निरीक्षक पी. आर. चव्हाण, युनिट प्रमुख दिनेश गोयर यांचा समावेश होता.