जळगाव। शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. आरोग्य अधिकारी विकास पाटील यांनी कामात सुधारणा करण्यासाठी मनसे नगरसेवक अनंत जोशी यांची मदत घेणार असल्याचे सभागृहात सांगितले. डॉ. पाटील यांचे उत्तर ऐकताच जोशी यांनी अक्षरशः त्यांचे पाय पकडले. स्थायी सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, अनिल वानखेडे उपस्थित होते.
ठेकेदार,कर्मचार्यांवर नियंत्रण नाही
जळगाव फर्स्टतर्फे महा स्वच्छता सर्व्हेक्षण घेवून आयुक्तांना भेटून अहवाल देत स्वच्छता दूत म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. तर महापालिकेचे कर्मचारी काय काम करतात असा रोखठोक सवाल अनंत जोशी यांनी केला. सफाई कर्मचारी सकाळी 6 ते 2 वाजेपर्यंत काम करीत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी सांगितले असता जोशी यांनी सफाई कर्मचारी त्यांच्या वार्डांत 8 ते 8.15 वाजता येत येतात व हे कर्मचारी सकाळी 10.30 वाजेनंतर दिसत नसल्याचे तक्रार केली. डॉ. पाटील यांचे ठेकेदार व एसआय यांच्यावर लक्ष नसल्याचा आरोप केला. प्रत्येक सभेत केवळ हो ला हो लावत असतात. त्यानंतर कुठलीही कारवाई करीत नसल्याचे सांगत आयुक्तांकडे चांगला अधिकारी शोधा अशी मागणी केली. आयुक्त सोनवणे यांनी काम का होत नाही याची विचारणा डॉ. पाटील यांच्याकडे केली. मात्र, डॉ. पाटील यांनी गोलमाल उत्तरे दिल्याने आयुक्त सोनवणे यांनी संताप व्यक्त करत तुम्हाला कळत नाही असे डॉ. पाटील यांना सुनावले. तर नगरसेविका ज्योती इंगळे यांनी कचरा वाहून नेणार्या गाड्यांवर ताडपत्री नसल्याने तो कचरा उडून रस्त्यांवर पडत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
डॉ.विकास पाटील यांना कार्यक्षमता वाढविण्याची शेवटची संधी
सभापती वर्षा खडके यांनी यात हस्तक्षेप करत कामात गांर्भींय हवे असे डॉ. पाटील यांना समजावत सफाई करणे तुमचे कर्तव्य असून शहराच्या आरोग्याचा प्रश्न असल्याचे सांगितले. डॉ. पाटील यांना सभापतींनी कामात सुधारणा करण्याची शेवटची संधी देत असल्याचे सांगितले. तसेच डॉ. पाटील यांच्याकडे हे सर्व काम करण्याची क्षमता नसल्याचे मान्य करण्यास सांगितले. कचरा उचलणे हे त्यांचे कर्तव्य असल्याची जाणीव यावेळी सभापतींनी डॉ. पाटील यांना करून दिली. डॉ. पाटील यांनी स्वतःमध्ये 100 टक्के बदल करेल असे आश्वासन सभागृहाला दिले. आयुक्त सोनवणे यांनी देखील आरोग्य अधिकार्यांना ही शेवटची संधी असल्याचे जाणीव त्यांना करून दिली. कामात सुधारणा करेल असे सांगत असतांना नगरसेवक अनंत जोशी यांची मदत घईल असे सांगताच जोशी यांनी डॉ. विकास पाटील यांचे सभागृहातच पाय पकडले.
दुर्गधीयुक्त पाण्याने शहरात साथीचे आजार
शहरात पिवळे पाणी येत असल्याची तक्रार असल्याचे नगरसेवक अनंत जोशी यांनी केली. पाणी पुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी शहरात पिवळे पाणी येत नसल्याचे सांगितले तसेच नागरिकांकडून तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक जोशी यांनी पाणी पुरवठा अभियांत्यांनी पाण्याचे नमुने घेतांना बोलविले नसल्याने नाराजी व्यक्त केली. पाणी तपासणी अहवाल महासभेत मागितल्यावर देण्यात आल्याने जोशी यांनी सांगितले. शहरात येणार्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. वर्षांनुवर्ष ही समस्या असतांना यावर कायमस्वरूपी उपाययोजना का करण्यात येत नाही याची विचारणा केली. आयुक्त सोनवणे यांनी याविषयातील तज्ज्ञ कार्डीले यांचा अहवाल मागविण्यात आला असून गटारीतील पाणी पुरवठा करणार्या पाइर्पंचे लिकेज तातडीने दुरूस्त करण्याचे आदेश दिलेत.
मनपा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या वाढवा
महापालिकेच्या रूग्णालयात किती सिजरीन व किती नॉर्मल प्रसुती होता याची विचारणा भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. याला उत्तर देतांना डॉ. रावलाणी यांनी मागील वर्षी 206 सिजरीन व 942 नॉर्मल प्रसुती करण्यात आल्याची माहिती दिली. यावर सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित करत पूर्वी महिन्याला 300 डिलवरी होत असतांना याचे प्रमाण का घटले आहे असा प्रश्न उपस्थित केला. तसेच डॉक्टरांची संख्या कमी पडत आहे का याची विचारणा केली. डॉ. रावलाणी यांनी डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे मान्य करीत चांगली सेवा देत असल्याचे सभागृहास सांगितले. 6 एमबीबीएस डॉक्टरांची पदेरिक्त असून जाहिरात काढली असता त्यास प्रतिसाद मिळाले नसल्याचे डॉ. रावलाणी यांनी सांगितले. सोनवणे यांनी महापालिकेच्या रूग्णालयात शहरातीलच नाही तर परिसारातील खेड्यातून देखील पेशंट येत असल्याने डॉक्टरांची संख्या वाढविण्याची मागणी केली. पृथ्वीराज सोनवणे यांनी डॉक्टरांची रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी केली. तसेच शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात मनपा कमी पडत असल्याचे म्हटले आहे. डॉक्टारांची संख्या वाढल्यास नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यास मदत होईल, असे पृथ्वीराज सोनवणे यांनी सांगितले.
पाच वर्षात टाकी साफ केली नाही
नितीन बरडे यांनी जलशुद्धीरकण के्ंरद्रातील फिल्टर व्यवस्थित आहे का?, सँड बेड स्वच्छ करता का? पाणीचे टाकी गेल्या पाच वर्षांपासून साफ करण्यात यांनी एनजीपीने अहवाल दिला नसून पाणी तपासणींकांचे मार्गदर्शन मागविण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. आयुक्त सोनवणे यांनी हाच मुद्दा पकडत एनजीपी जर सांगू शकत नसल्याने परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे.
मुदतपूर्व आयुक्तांना निरोप
आयुक्त जीवन सोनवणे यांचा कार्यकाळ 30 जून राजी संपत असून त्यांची ही शेवटची स्थायी सभा असल्याने सभागृहाने त्यांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. परंतु त्यांना 2 वर्षाचा सेवाकाळ वाढवून मिळावा याबाबत मंगळवारी झालेल्या महासभेत ठराव पारीत करून तो मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार हा ठराव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामुळे आयुक्तांना निरोप देऊ नये असे नगरसेवक श्यामकांत सोनवणे यांनी सूचविले. सभागृहाने त्यांचा निरोपाचा सत्काराचा सोपास्कार करून घेतला.