सांगवी कृती समितीच्यावतीने
सांगवी : जुनी सांगवी परिसरातील मुळा, पवना नदीतील वाढलेली जलपर्णी, त्यात सोडलेले कारखान्यांचे दुषित पाणी, सोबत औंध भागाकडून नदीत येणारे सांडपाणी यामुळे सांगवीकर नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गोष्टींकडे पालिका प्रशासन व जिल्हाधिकार्यांचे लक्ष वेधण्यासाठी सांगवी नागरीक कृती समितीच्यावतीने बुधवारी येथील अहिल्यादेवी होळकर चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कृती समितीच्या अध्यक्षा उज्वला ढोरे, सुवर्णा सरोदे, कोमल कवडे, मोनिका ढोरे, नंदा चव्हाण, सुनिता पाटिल, मनोहर पवार, बबन ढोरे, जानराव यावले, रावसाहेब ढमाले, लक्ष्मण निवंगुणे, लक्ष्मण ठाकर, दशरथ ढोरे, प्रकाश कानडे उपोषणास बसले होते.
सांगवी नागरीक कृती समितीच्यावतीने पवना नदीपात्रावरील दशक्रिया विधीघाटाची उंची वाढवून सुशोभिकरण करावे, राजरोसपणे चालणारे अवैध धंदे बंद करावेत, शेजारीच आरोग्य विभागाकडून सांगवी परिसरातील कचरा डंपींग केला जातो. कचर्याच्या दुर्गंधीमुळे लहान मुले, अबालवृद्धांना याचा त्रास सहन करावा लागतो, याची जागा बदलून योग्य ती विल्हेवाट लावावी अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केल्या आहेत.