रावेर । वहदत-ए-इस्मामी हिंदतर्फे घेण्यात आलेल्या वैद्यकिय शिबीरात सुमारे दोन हजार महिला व पुरुषांनी तपासणी करुन औषधी घेतल्या. शहरातून या कॅम्पला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शहरातील चावळी भागात सर्व आजारांवर उपचारासाठी शिबीर घेण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यासह राज्यभरातून डॉक्टरांची उपस्थिती होती. या तपासणी शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे तपासणी केल्यानंतर लगेच औषधीही मोफत उपलब्ध करण्यात आली होती.
शिबीरात या डॉक्टरांनी दिली सेवा
या वैद्यकिय शिबीरामध्ये डॉ. बी.बी. बारेला, डॉ. प्रमोद ठाकुर, डॉ. पराग चौधरी, डॉ. मंदार काळे, डॉ. चेतन चौधरी, डॉ. राजेेंद्र भालोदे, डॉ. राहुल चिरवाडे, डॉ. ज्ञानेद पाटील, डॉ. निखिल पाटील, डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. सारिका पाटील, डॉ. अभिषेक फिरके, डॉ. वरुण सरोदे, डॉ. प्रविण पवार, डॉ. दत्तप्रसाद दलाल, डॉ. भगवान कुयटेे, डॉ. गुलाबराव पाटील, डॉ. स्वप्निल रावेरकर यांच्यासह अनेक डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आलेल्या रुग्णांची वैद्यकिय तपासणी केली.
यांनी घेतले परिश्रम
यावेळी अतिक अहमद, सैय्यद लियाकत, अ. हेमान, फिरोज खान, शेख एजाज, जाकिर खान, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, हरिष गणवाणी, पद्माकर महाजन, एम.ए. खान, नगरसेवक अॅड. सुरज चौधरी, शेख सादिक, अय्युब खान, शेख कलीम यांनी परिश्रम घेतले. इराक युथ फाऊंडेशनतर्फे रुग्णांना सोडण्यासाठी अॅम्ब्युलन्स, रिक्षाची सेवा उपलब्ध करण्यात आली होती.