नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांची पत्रपरिषदेत माहिती
चाळीसगाव । चाळीसगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात बुधवार २० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील यांच्यावर आरोग्य निरिक्षक व इतरांनी हल्ला करुन मारहाण केली ही घटना पोलीस ठाण्यापर्यंत गेली. हल्ला करणार्या संबंधितावर कारवाई करु व गुंडाच्या दहशतीपासून नगर पालिका मुक्त करणार असल्याचे माहिती नगराध्यक्षा आशालता चव्हाण व गटनेते राजेंद्र चौधरी, आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील यांनी गुरूवार २१ सप्टेंबर २०१७ रोजी चाळीसगांव नगर परिषद सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आरोग्य सभापती घृष्णेश्वर पाटील यांनी बोलतांना सांगितले की, जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून नगरपरिषदेत आम्हाला सत्ता दिली. शहरात मोठ्याप्रमाणावर चांगले काम केल्याचे कौतुक देखील झाले चाळीसगाव शहर स्वच्छसुंदर कसे होईल, यासाठी आमदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून शहरात स्वच्छेतेला सुरुवात करुन शहर प्लास्टिक मुक्त अभियान राबविले, नदी स्वच्छता केली. हे करत असतांना नागरिकांनी देखील त्याचे कौतुक केले. आरोग्य निरिक्षक यांचे काही निकटवर्तीय यांना त्याचा त्रास झाल्याने तीन महिन्यानंतर विपरीत परिणाम दिसु लागले आरोग्य निरिक्षक संजय गोयर हे त्यांच्या मर्जितील लोकांना मनाप्रमाणे काम देत असल्याचा देखील यावेळी आरोप केला. वार्डातफेरफटका मारत असतांना त्याठिकाणी २ किंवा ३ कर्मचारी उपस्थित राहातात म्हणून शहरात तक्रारी वाढल्या होत्या. यावर नियंत्रण राहावे म्हणून ५ जुलै रोजी नगर पालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत आरोग्य निरिक्षक संजय गोयर यांना सुचना दिल्याने त्याचा राग येवून त्यांनी २० सप्टेंबर रोजी नगरपालिका कार्यालयात माझ्याशी अरेरावी करुन गुंडाना समवेत माझ्यावर हमला केला. रोशन जाधव व संजय गोयर यांनी आपसात काही तरी चर्चा करुन रोशन जाधव यांनी माझ्याशी बाचाबाची केली आणि माझ्या नातेवाइकानां त्रास देतात असे, मला बोलले रोशन जाधव यांचे भाऊ हे मुकादम असून त्यांच्या बद्दल बोलल्याने देखील त्याचा राग येवून रोशन जाधव यांनी गुडांकरवी माझ्यावर हल्ला केल्याने त्यांनी सांगितले. जन्म मृत्यु विभागातील कर्मचारी हे दाखल्यांसाठी अतिरिक्त ५० ते १०० रुपये घेतात याची तक्रार केली याचा देखील त्यांना राग आला. त्याठिकाणी २ ते ३ कर्मचार्यांची गरज असतांना ७ ते ८ कर्मचारी आहेत नगर पालिकेच्या माध्यमातून गाव स्वच्छ करणार आहोत कुणाच्याहीदादागिरी धाकदड शाहीला आम्ही घाबणार नाही व माझ्यावर झालेल्या हल्याबाबत वरिष्ठाशी माझी चर्चा सुरु आहे. लवकरच त्याबाबत कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नगराध्यक्षांनी केला घटनेचा निषेध
नगराध्यक्षा यांनी सदर घटना ही निषेधार्थ असून यांची पुर्णरावृत्ती होऊ नये याची सर्व नगरसेवकांनी खबरदारी घ्यावी असे प्रकार होयाला नको या पुढे खबरादारी घेऊ असे सांगितले तरगटनेते राजेंद्र चौधरी यांनी घटनेचा निषेध करुन झालेली घटना ही चुकीची आहे. झालेल्या घटनेबाबत कारवाई केली जाईल. कोणाला ही पाठीशी घातले जाणार नाही. नगरपालिका ही नागरिकांची आहे त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत या घटनेची चौकशी होवून त्याचा अहवाल आल्यावर मिटींग घेण्यात येईल व सर्वानुमते निर्णय घेऊन कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष के.बी.सांळुखे नगरसेवक अरुण अहिरे, विजया पवार, चिरागउद्दीन शेख महेंद्र मोरे, चंद्रकांत तायडे, विजया पवार, नितीन पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी अदि मान्यवर उपस्थित होते.