जळगाव- निरोगी व्यक्ती कुटूंबाची, संस्थेतील कामाची जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकतो़ त्यामुळे कर्मचाºयांची वैयक्तीक व कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे व आरोग्य हितासाठी नियमित तपासणी करावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले़
महावितरण, आॅर्किड मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांसाठीवैद्यकिय तपासणी शिबिर मंगळवारी विद्युत भवनात आयोजित करण्यात आले होते़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी जळगाव परिमंडळाचे अधिक्षक अभियंता फारुख शेख, अधिक्षक अभियंता(पायाभुत आराखडा) चंद्रशेखर मानकर, आॅर्किड हॉस्पिटलचे डॉ.हितेंद्र ओमडीकर, डॉ.संकेत विसपुते, कांताई नेत्रालयाचे समन्वयक अमोल गायकवाड आदी उपस्थित होते़ शिबिरात १७० अधिकारी-कर्मचाºयांची हृदयरोग, सांधेदुखी, मधुमेह, रक्तदाब, नेत्र व मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली़ डॉ़ हितेंद्र ओमडीकर, डॉ़ संकेत विसपुते, डॉ़ चित्रलेखा पाटील, डॉ़ अंशु पगारिया, केतन सरोदे यांच्यासह वैद्यकीय अधिकाºयांच्या टीमने तपासणी केली़
यांची होती उपस्थिती
शिबिराप्रसंगी कार्यकारी अभियंता शिवाजी भालशंकर, प्रदीप सोरटे, विजेंद्र मुळे, विशाल कुलकर्णी, संजय तडवी, अविनाश राऊत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, वरिष्ठ व्यवस्थापक रामचंद्र वैदकर, व्यवस्थापक उध्दव कडवे, आॅर्किडचे जनसंपर्क अधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुकेश अहिरे, दीपक कोळी, रवींद्र चौधरी, नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.