पिंपरी-चिंचवड : आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वेदिक धर्म संस्थानतर्फे चैत्र नवरात्री अष्टमीनिमित्त लक्ष्मी होम, कुंकूमार्चन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत तुकारामनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल मैदानात आयोजित कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड सह पुण्यातील भाविकांनी सहभागी होत हवन, मंत्रस्नान व सत्संग व गहन ध्यानाचा अनुभव घेतला. मानव जातीच्या कल्याणासाठी, सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी उत्तम राहण्यासाठी आणि वातावरणात सकारात्मक उर्जा व इच्छापूर्तीसाठी साकडे घालण्यात आले.
अष्ट लक्ष्मीचे हवन स्वामी प्रवीण शर्मा, संतोष व अभय पंडित तसेच बेंगलोर येथील पंडित व वेदिक धर्म संस्थान समन्वयक निपा जानी यांनी केले. प्रशिक्षक सचिन नाईक, सौंदर्या मुलगे, अतुल तातर, उमा देशमुख, ऋषिकेश जोशी, सुमित जाधव, संगमेश मनट्टी, धनराज सोळुखे, तेजश्री कपोते, श्रेयश, प्रतिमा नाईक, नंदीनी सिंग, ऐश्वर्या मुलगे, रोमील, पुजा गराडे, अपुर्वा मुलगे या स्वयंसेवकांनी संयोजन केले. सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ जोशी यांनी सहकार्य केले.