आर्थिक निकषावरील आरक्षण उधळून लावू

0

मुंबई । या देशात जोपर्यंत जाती आहेत तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षण राहणार. दलित आदिवासी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आधी जातीव्यवस्था नष्ट करा मग जाती आधारित आरक्षणाविरुद्ध बोला. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर सर्व ताकदीनिशी तो प्रयत्न हाणून पाडू. जाती नष्ट झाल्याशिवाय जाती आधारित आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत जातीच्या निकषावर नव्हे तर आर्थिक निकषावर आरक्षण या पुढील काळात असावे अशी भूमिका मांडली होती. सर्व आरक्षण आर्थिक निकषावर असायला हवे या शरद पवारांच्या भूमिकेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे.