पाचोरा । तालुक्यातील आर्वे येथे कोणतेही कारण नसतांना मागुन येऊन एकास डोक्यात लोखंडी वखारची पास मारून जबर जखमी केली असुन जखमीस जळगावी रवाना करण्यातआले आहे.
तालुक्याच्या आर्वे गावांत विनोद रामदास बडगुजर (वय 45) यांस कोणतेही कारण नसतांना रमेश सुपडू तडवी याने मागावुन डोक्यात लोखंडी वखारच्या पास ने जबर मारहाण केली जखमीस जळगाव उपचारासाठी हलविण्यात आले. जखमीच्या जळगाव येथुन जबाब आल्यावर पोलिस स्टेशनला रमेश तडवी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाचोरा पोलिस अधिकारी करीत आहे.