आर. अश्विन व मुरली विजय आयपीएलमधून बाहेर?

0

नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नंतर भारताच ऑफ स्पिनर गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि मुरली विजय हे दोन्ही खेळाडू आयपीएल 10 या मौसमातून बाहेर राहू शकतात असे संकेत मिळत आहे. असे मानले जात आहे की, कमरेच्या दुखापतीमुळे (स्पोर्ट हर्निया)च्या कारणामुळे रविचंदन अश्विन आयपीएल 10 मध्ये राइजिंग पुणे या संघाकडून खेळू शकणार नाही.तर मुरली विजयला खांद्याला दुखापत झाल्याने आयपीएल मधून बाहेर राहण्याचा निर्णय घेवू शकतो असे माहिती मिळत आहे.

सर्वाधिक षटके टाकणारा अश्‍विन
कांगारू विरूध्द झालेल्या बॉर्डर -गावस्कर चषकात चांगले प्रदर्शन करणार आर.अश्विन सहा ते आठ आठवडे खेळापासून बाहेर राहू शकतो.मात्र आशा आहे की तो चॅम्पियन चषका पर्यंत संपुर्णपणे बरा झालेला असले.अश्विन लवकरच रिहेबिलिटेशन सुरू करू शकतो.चॅम्पियन चषकापर्यंत पुर्णपणे फिट होवून आपल्या फॉर्मत येवू शकले.भारतीय संघाचा घरचा दौरा खुप व्यस्त होता.ज्यामध्ये न्युझीलंड,इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया या देशाबरोबर 13 सामने खेळले आहे.या सामन्यामध्ये आर अश्विने एकुण 738.2 षटके टाकली.हे कोणत्याही कसोटी मालिकेत एकट्या गोलंदाजाने केलेली गोलंदाजी सर्वाधिक आहे. यात त्याने 82 फलंदाजांना बाद केले आहे.

अश्‍विननंतर लोकेश राहुल यास्पर्धेतून बाहेर झाला
इंग्लंड बरोबरच्या कसोटी मालिकेत डिसेंबर महिन्यात अश्विन दुखापत ग्रस्त झाला होता. यानंतर कर्नाटक विरूध्द खेळतांना रणजी चषकच्या उपान्तफेरीत तामिळनाडू कडून खेळू शकला नाही.अश्विन व्यतिरिक्त आयपीएल 10 मध्ये खांद्याच्या दुखापतीने ग्रस्त असलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या खेळण्यावर अनिश्‍चिता आहे.तेथे दुखापतग्रस्त लोकेश राहुल यास्पर्धेतून बाहेर झाला आहे. याचरोबर कांगारू विरूध्द खेळतांना उत्कृष्ट गोलंदाजी करणारा गोलंदाज उमेश यादव व अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा हे सुध्दा आयपीएलच्या सुरवातीचे सामने खेळू शकणार नाही आहे.