पुणे : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर. आर. पाटील यांच्या राजकीय वारसदार त्यांची कन्या स्मिता पाटील यांचा साखरपुडा पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी संपन्ना झाला. त्या आता पुणे जिल्ह्याच्या आणि दौंड तालुक्याच्या सूनबाई होणार आहेत. मे 2018 मध्ये हे जोडपे विवाहबद्ध होणार आहे.
पवारांच्या पुढाकारानेच जमले
थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मे रोजी पुण्यात मगरपट्टा सिटीत विवाहसमारंभ पार पडणार आहे. या लग्नाची सर्व जबाबदारी पवारांनी थोरात यांच्याकडे सोपविली आहे. रमेश थोरात यांचे थोरले बंधू प्रभाकर थोरात यांचा मुलगा आनंद आणि आर. आर. आबांची कन्या स्मिता यांचे लग्न शरद पवारांच्या पुढाकारानेच जमले आहे. आनंदने परदेशात शिक्षण घेतले असून, सध्या तो पुण्यात व्यावसाय करतो. तर स्मिता यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जबाबदारी आहे.
आबांच्या कुटुंबांकडे पवारांचे लक्ष
आर. आर. आबा हे शरद पवारांचे सर्वाधिक विश्वासू सहकारी होते. आबांच्या निधनानंतर पवारांनी त्यांच्या कुटुंबांकडे वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार पवारांनी आबांच्या माघारी शरद पवारांनी स्मिताच्या लग्नात लक्ष घातले. आबांना दोन मुली व मुलगा रोहित आहे. मात्र, हे सर्व जण अद्याप महाविद्यालयीन व शालेय शिक्षण घेत होते. येत्या मे महिन्यात स्मिता व आनंद यांच्या लग्नाचा बार पुण्यात उडणार आहे.
अमित ठाकरेंचा आज साखरपुडा
मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा आज फॅशन डिझायनर मिताली बोरूडे यांच्याशी साखरपुडा होणार आहे. अतिशय मोजक्याच लोकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले असून दादर येथील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच कृष्णकुंज येथे साध्या पध्दतीने साखरपुडा होणार आहे. मताली या अमित ठाकरे यांच्या बालमैत्रीण आहेत. प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. संजय बोरुडे यांची मिताली ही मुलगी आहे. अमित यांचे शिक्षण आर. ए. पोद्दार महाविद्यालयातुन तर मिताली यांचे शिक्षण रुईया महाविद्यालयातुन झाले आहे. तेथेच त्यांची ओळख झाली व या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत.