आर. माधवन घेऊन येतोय ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’

0

मुंबई : ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट ‘ चित्रपट घेऊन आर. माधवन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. हिंदी, तामिळ आणि इंग्रजी भाषेत हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टिझर आता प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट काय आहे याबद्दलची उत्सुकता वाढवणारे निवेदन एका व्हिडिओतून माधवनने केले आहे.

या व्हिडिओत आर. माधवन म्हणतो, ”जगात अनेक कथा आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. पण अशा अनेक कथा आहेत ज्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल. या कथा तुम्हाला माहिती नाहीत याचा अर्थ तुम्हाला देशाबद्दल काही माहिती नाही. नंबी नारायण यांची एक अशी कथा आहे, ज्याबद्दल तुम्ही ऐकाल किंवा त्या माणसाने साध्य केलेल्या गोष्टी जेव्हा पाहाल तर खात्री बाळगा तुम्हाला बोलल्या शिवाय राहवणार नाही. ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’. आपल्या देशाची एक अशी कथा ज्यांना माहिती नाही त्यांना कळेल, ज्यांना वाटतं की त्यांना माहिती आहे ते चकित होतील.”असे माधवन म्हणला.