शिरपूर । आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या सर्व शिपाईबांधवांसाठी पाच दिवसीय नवचेतना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुदेव प.पू. श्रीश्रीरवशंकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरात आर्ट ऑफ लिव्हींग मार्फत शिरपूर येथे नेहमी योगशिबीरांचे आयोजन करण्यात येते. संस्थेचे अध्यक्ष माजीशिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या सहयोग शिबीराच्या प्रमुख रिशा पटेल, योग शिक्षक देविसिंग हजारी यांनी आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या 125 शिपाईबांधवांसाठी 1 ते 5 जून या कालावधीत दररोज सकाळी 8 ते सकाळी 9.30 पर्यंत नियमितपणे नवचेतना योगशिबीर आयोजित केले होते.
या पाच दिवसीय योग शिबीरात सर्व शिपाई बांधवांना योगाचे महत्व् विषद करण्यात येवून आहार, विहार याबाबत सविस्तरपणे माहिती देण्यात आली. तसेच विविध योगासने प्रकार, विविध योग क्रिया प्रकार शिकविण्यात आले. सर्व कर्मचारीबांधवांचे आरोग्य् चांगले रहावे या उद्देशाने योगशिबीर नियमितपणे या पुढेही आयोजित केले जाणार असून या नवचेतना शिबीराचे अनेक चांगले अनुभव कथन करुन आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे कर्मचारी बांधवांनी सांगितले.