शिरपूर । आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील ड्युअल एम.सी.ए.च्या विद्यार्थ्यांनी नुकतेच एप्रिल 2017 मध्ये घेण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय परिक्षेत घवघवीत यश मिळवत सदैव उत्कृष्ट निकालाची परंपरा अखंडीत राखली. आय.एम.आर.डी. चे विद्यार्थी विविध अभ्यासक्रमात सतत गुणवत्ता यादीत चमकतात. ड्युअल एम.सी.ए. तृतीय वर्षामधून परिसंस्थेतील 5 विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रथम दहा कमांकात विशेष प्राविण्य मिळविले.त्यात शेख मोनिसा या विद्यार्थीनीने 8.02 ग्रेड मिळवून विद्यापीठात तृतीय व परिसंस्थेत प्रथम स्थान मिळविले. कु. शर्मा वैष्णवी व मराठे रुचिता या विद्यार्थीनीनी 7.88 ग्रेड मिळवून विद्यापीठात चतूर्थ व परिसंस्थेत द्वीतीय स्थान मिळविले. तर कु. सिधी वंदना या विद्यार्थीनीने 7.74 ग्रेड मिळवून विद्यापीठात सहावे व परिसंस्थेत तृतीय स्थान मिळविले.ड्युअल एम.सी.ए. द्वितीय वर्षामधून परिसंस्थेतील 10 विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रथम दहा कमांकात विशेष प्राविण्य मिळविले.यामध्ये पाटील तुषार 5.89 ग्रेड मिळवून विद्यापीठात व परिसंस्थेत प्रथम स्थान मिळविले. तर चौधरी राहुल 5.82 ग्रेड मिळवून विद्यापीठात व परिसंस्थेत द्वीतीय स्थान मिळविले. तसेच कु. देवरे जयश्री 5.75 ग्रेड मिळवून विद्यापीठात व परिसंस्थेत तृतीय स्थान मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, संस्थेचे अध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष मा. भुपेशभाई पटेल, संस्थेचे चेअरमन मा.राजगोपालजी भंडारी, सचिव रावसाहेब प्रभाकर चव्हाण, संचालक डॉ. के.बी.पाटील सर परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील,एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा. मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभाग़प्रमुख प्रा, मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख प्रा. तुषार पटेल यांनी केले. प्रा. नरेंद्र राजपूत, प्रा. मनोज सोनवणे, प्रा. सुमित बिडे, प्रा. विजया अहिरे, प्रा.स्वप्निल गोजे, प्रा. अमित पाटील, प्रा.विशाल पवार, या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले, तसेच राजिस्ट्रार वैशाली गोरले, डी.यु. चौधरी, विशाल माहेश्वरी, कविता पाटील, निलिमा पाटील, भारती भावसार, धिरज शेटे, दिपक बोरसे, किशोर सोनवणे, सचिन नवले, दिपक दोरीक यांनी अभिनंदन केले.