आर.सी.पटेल आश्रमशाळेत वृक्षारोपण व वृक्षदिंडी

0

शिरपूर । येथील आर.सी.पटेल अनुदानित आश्रमशाळेत वृक्षारोपण कार्यक्रम व वृक्षदिंडीसह जनप्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षदिंडीत आर.सी.पटेल माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एच.के.कोळी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी.एम.माळी तसेच इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.रामसिंगनगर येथील प्रत्येक गल्लीतून दिंडी काढण्यात आली. माकडा माकडा हूप हुप…झाडे लावा खूप-खूप, झाडे लावा झाडे जगवा, झाडे जगवा पर्यावरण वाचवा…अशा अनेक घोषणा देऊन जन-प्रबोधन करण्यात आले. शाळेच्या बँड पथकाने वृक्षदिंडीचे अग्रस्थानी राहून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मुख्याध्यापक एच.के.कोळी, मुख्याध्यापक बी.एम.माळी यांनी विधिवत पूजा करून वृक्षारोपण केले.