शिरपूर । येथील आर.सी.पटेल इंग्लिश मिडीअम प्री-प्रायमरी स्कूल मध्ये क्रीडा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक फिरोज काझी, माजी उपनगराध्यक्ष मंजूर शेख इब्राहीम, माजी सभापती जकिर शेख, संस्थेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्युलि थॉमस, मुख्याध्यापिका रिबेका नेल्सन, मुख्याध्यापिका स्मिता पंचभाई, मुख्याध्यापक महेंद्रसिंग परदेशी, मुख्याध्यापिका एलिझाबेथ, पोलीस कॉन्स्टेबल स्वाती गुजराथी, रुपेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.
या क्रीडा मेळाव्यात विद्यार्थांनी फ्लोट, ड्रील, लेझिम, मानवी मनोरा आदी अनेक खेळ व सुंदर कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण सहजपणे केले. शेती व त्या संबंधित सर्व बाबी म्हणजेच पीक, शेतीची साधने, पिकांचा हंगाम यांची माहिती फ्लोटच्या माध्यमातून सादर करण्यात आली.
बक्षीस देवून सन्मान
प्ले-गृपपासून सिनिअर के.जी. पर्यंत 700 विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रत्येक वर्गनिहाय स्पर्धांमधून तिन यशस्वी स्पर्धक निवडण्यात आले. त्यांना गोल्डन, सिल्वर व ब्रॉन्झ मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनंतर पालकांसाठी सुद्धा विविध खेळ घेण्यात आले. त्यांच्यातून यशस्वी विजेत्या पालकांनाही बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका ज्युलि थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षिका मनीषा पाटील व शिक्षिका सुषमा पाटील, सारिका रुद्रे, राजश्री खरे, सपना तरते, कपिल बाविस्कर, शिक्षक व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.