आर.सी.पटेल डी. फार्मसीचा 97 टक्के निकाल

0

शिरपूर। महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे एप्रिल 2017 घेण्यात आलेल्या औषधनिर्माण शास्त्र पदविका परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून आर.सी.पटेल इन्स्टिटयुट ऑफ फार्मसीचा निकाल 97 टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, प्राचार्य डॉ.एस.जे.सुराणा, विभाग प्रमुख डॉ.एन.जी.हासवाणी यांनी कौतुक केले आहे.

वर्षा जैन 88 टक्के गुण मिळवून प्रथम
विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.प्रथम वर्ष डी.फार्मसी मध्ये वर्षा राजेंद्र जैन 88 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने यश प्राप्त् केले. भारती भाईदास शिंदे 87 टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने आणि सिमा गुलाब शिंपी 86 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. व्दितीय वर्ष डी.फार्मसी मध्ये दानिश हरून पटेल 89 टक्के गुण मिळवून प्रथम, सपना प्रकाश पवार 88 टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने व प्रियंका सखाराम वळवी 86 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना प्रा.अश्विन तोरणे, प्रा.गोविंदा भंडारी, प्रा.संगिता बडगुजर,प्रा.प्रदिप पाटील, प्रा.पुजा मुंदडा, प्रा.युवराज पावरा, प्रा.सुघोष उपासनी, प्रा.घन:श्यामगिरणार, दिनेश चौधरी, दिपक जाधव, सुजित राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.