आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये दागिन्यांचा दर सर्वात कमी

0

जळगाव। जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर विविध वस्तूंची भाव वाढ होईल, सोन्याचे व्यवहार महाग होतील, ही भीती बाळगण्याचे कारण नसून रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स कडील 91.60 हॉलमार्क दागिन्यांच्या किमती आजही सर्वात कमी असल्याचे संचालक सुशीलकुमारजी बाफना यांनी म्हटले आहे. यामुळे अलंकार प्रेमींना दिलासा मिळाला आहे.

हॉलमार्क दागिने सर्वात रास्त भावाने उपलब्ध
केंद्र सरकारने संपूर्ण देशातील करप्रणाली एक सामान करण्याच्या, एका सूत्रात बांधण्याच्या उद्देशाने 1 जुलैपासून जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा रतनलाल सी. ज्वेलर्सने सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवून स्वागतच केले आहे. सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मात्र या विषयी भाववाढीच्या शंका आहेत. मात्र सध्या लागू असलेल्या करांनंतर ही आमच्याकडील हॉलमार्क दागिने सर्वात रास्त भावाने उपलब्ध असल्याने अलंकार प्रेमींनी भिती बाळगायची आवश्यकता नसून कुठूनही खरेदी केलेले 91.60 हॉलमार्क जुने दागिने बदलून घेतांना घट लागणार नसल्याचेही बाफना यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व दागिने हॉलमार्कने प्रमाणित
रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स स्वर्णतीर्थ म्हणून सर्व भारतात नावारूपास आले असून आपल्या सचोटी व पारदर्शक व्यवहारामुळे ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरले आहे. हॉलमार्क दागिने, अँटिक ज्वेलरी, अनन्य डायमंड, स्वर्णालंकारांचे विविध प्रकार व डिझाईन्ससाठी प्रसिद्ध अशा या शो रूममध्ये सोन्याचा भाव इतर ठिकाणांपेक्षा नेहमीच कमी असतो. तसेच जुने 91.60 हॉलमार्क प्रमाणित दागिने बदलून देताना कोणतीही घट लावली जात नाही हे या प्रतिष्ठानाचे वैशिष्ट्य आहे.