आल्या आल्याच पाच तलाठींचे निलंबन ?

0

पहूर । गेल्या काही वर्षापासून महसूल विभाग, जामनेर येथील नव्याने आलेले प्रांताधिकारी श्री. शर्मा यांनी अत्यंत कमी कालावधीत वस्तुस्थितीला धरून महसलू खात्यातील सावळा गोंधळाच्या प्रकरणाची छाननी करण्याचा धडाका लावला असून आतापर्यंत झालेला सावळा गोंधळ व महसूल खात्याची केलेली दिशाभूल व मुद्रांक लिखाण न दाखवता शासनाची केलेली फसवणूक यामुळे अनेक शेतकरी त्यात अल्पभूधारक (निराधार), अत्यल्पभूधारक शेतकरी, महाभूधारक शेतकर्‍यांच्या दादागिरीला बळी पडत असून ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

अभ्यासू वृत्तीने प्रकरण हाताळण्याची शैली त्यांच्या महसूल खात्यात काम करतांना दिरंगाई करणार्‍या तलाठी यांना त्वरीत निलंबीत केल्यामुळे अनेक अन्याय झालेल्या शेतकर्‍यांसाठी ते एक नवे आशेचे किरण म्हणून त्यांचा ठसा उमटला आहे. त्यामुळे महाभूधारक शेतकरी आपल्या क्षेत्राच्या औद्योगिकरणाच्या स्वप्नामुळे वाटचाल करत असून वहिवाटातील रस्ते विक्री करून महसूल विभागाकडे पुन्हा रस्त्याची स्वतःचा गट नं. न दर्शविता अल्पभूधारक अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांचे काही एक लेखी पुरावा नसतांना रस्त्याची मागणी कुठल्या तरी वजनाने पूर्ण करून रोडलगत जमिन असल्याचे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असून एकाच गटातील तीन रस्ते या शेतकर्‍यांनी महसूलला अंधारात ठेऊन विक्री केले आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यातील इस्टेट ब्रोकरचे सुद्धा खरी कागदपत्रे प्रांताधिकार्‍यांच्या समोर आली तर नक्कीच मोठा घोटाळा नवीन आलेल्या प्रांताधिकारी जलाश शर्मा यांचेसमोर एक आव्हान म्ळणून समोर येईलच. त्यामुळे अवैध मार्गाने जमविलेली संपत्तीचे सुद्धा गौडबंगाल शर्मा साहेबांच्या अल्पकाळातील कामाकाजात निदर्शनास आल्यास सरकारच्या नव्या धोरणाला एक नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा जिल्ह्यातून तसेच जामनेर तालुक्यातून शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.