आळंदीतून माऊली ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

0

खान्देशातील हजारो वारकर्‍यांची उपस्थिती

फैजपूर- श्री क्षेत्र आळंदी येथून माऊली ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा लाखो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यात फैजपूरसह खान्देशातून मोठ्या संख्येने वारकरी सहभागी झाले. दिगंबर महाराज चिनावलकर मठ संस्थाध्यक्ष नरेंद्र नारखेडे , हभप भरत महाराज म्हैसवाडीकर, विक्रांत नारखेडे, मयूर नारखेडे, धीरज नारखेडे, किशोर तांबट, हेमराज टोके, भानूदास महाराज, भुसावळ, मूलचंद सरोदे यासह भाविक या सोहळ्यात शेडगे दिंडी नंबर तीनच्या माध्यमातून वारी करणार आहे.

पालखी सोहळ्यामुळे आनंद
या दिंडीमध्ये सर्व वारकरी संप्रदायाचे थोर कीर्तनकार सहभागी झाले आहेत.भ हभप पांडुरंग महाराज घुले, शिंदे माऊलीसह वारकरी शिक्षण संस्था गाथा मंदिर, देहू गुरुकुलचे सर्व शिक्षक महाराज वर्ग व विद्यार्थी यामुळे पालखी सोहळ्यात आनंद निर्माण झाला आहे. हा अनुभव सोहळ्यात सहभागी झाले ले नरेंद्र नारखेडे यांनी कळविला आहे. पालखी सोहळा आज पुणे मुक्कामी राहून पुढे सासवड, जेजुरी, लोणंद, फलटण, वेळापूर, नातेपुते, वेळापूर यामार्गे वाखरी येथे हा पालखी सोहळा व महाराष्ट्रातून आलेल्या सर्व संतांच्या पालखी एकत्र होऊन सुमारे आठ लाख वारकरी मिळून सोहळा 11 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आगमन होणार आहे.