श्री विठ्ठल.. विठ्ठल … हरिनामाच्या जयघोषात निघाली मिरवणुक
आळंदी : श्री नरसिव्ह सरवस्ती स्वामी महाराज यांचे वार्षिक उत्सवातील रथोत्सव प्रदक्षिणा मिरवणूक श्री विठ्ठल.. श्री विठ्ठल … हरिनाम जयघोषात काढण्यात आली. यावेळी भाविकांनी श्रींचा रथ ओढत परंपरेने रथोत्सवात सहभाग घेत सेवा दिली. मार्गावर रांगोळ्यांचे पायघड्या, विद्युत रोषणाई, आतिषबाजी करण्यात आली होती. दर्शनास भाविकांनी गर्दी करीत दर्शन घेतले. श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठातून रथोत्सवाला सुरुवात होवून रथोत्सव चावडी चौक मार्गे मार्गस्थ झाला.
हे देखील वाचा
पारंपारिक रथोत्सवाची मिरवणुक…
परंपरेने श्रींचा रथोत्सव मारुती मंदिर, मरकळ चौक, पाण्याच्या टाकी मार्गे जात असतो. रथोत्सवात श्रींचा रथ स्वामी महाराज मठ मार्ग चाकण चौक, भैरवनाथ चौक, हजेरी मारुती मंदिर, चावडी चौक, नगरपरिषद चौक मार्गे माउली मंदिर लगतचे स्वामींचे मूळपीठ येथे स्वागत झाले. त्यानंतर महाद्वार चौकातून माउली मंदिर समोरून भराव रस्ता मार्गे चाकण चौकातून नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचा वैभवी रथोत्सव मठात आला. रथोत्सव मार्गावर श्रींचे स्वागतास रांगोळ्यांचे पायघड्या, पुष्पवर्षाव, स्वागत तसेच भाविकांनी श्रींची आरती करून पुष्पहार अर्पण करून पूजा केली. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
ठिकठिकाणी श्रींचे पूजन…
श्रींचा रथ मूळपीठावर आल्यानंतर ह.भ.प.विष्णू महाराज चक्रांकित कुटुंबीयांनी पूजा केली. श्रींचा रथोत्सव माउली मंदिर प्रागंणात श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने विश्वस्त अभय टिळक यांनी स्वागत केले. तसेच, श्रींचे पूजन केले. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, श्रींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, मानकरी उपस्थित होते. श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज संस्थान मठाचे पदाधिकारी, श्रींचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी परिवार, सेवक, वारकरी, भाविक, नागरिक उपस्थित होते. श्रींचे रथापुढे परंपरेने येथील मानकरी सेवक पै. सचिन रानवडे कुटुंबीयांनी नगारखाना सेवा रुजू केली. श्रींचे पुजारी आळंदीचे माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी परिवाराकडे श्रींपूजा, धार्मिक विधी नित्यनेमाने करण्याची सेवा आहे.