आळंदीत 14 हजार डस्टबिनचे मोफत वाटप

0

एन्पो कंपनीने जपले सामाजिक भान

आळंदीः येथील एन्प्रो इंडिया प्रा.लिमिटेड (मरकळ) या कंपनीच्यावतीने नगरपरिषदेस 14 हजार डस्ट बिनची भेट दिली. ही भेट मिळालेले डस्टबीन थेट नागरिकांना वाटप करण्यास नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते सुरुवात झाली. यापूर्वी दोन वेळा प्रातिनिधिक स्वरूपात डस्टबिनचे वाटप करण्यात आले. ‘स्वच्छ आळंदी’ या अभियानाला गती देण्यासाठी ओला व सुखा कचरा असे वर्गीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी आळंदीत स्वच्छता प्रभावी रहाण्यास मदत व्हावी यासाठी एंन्प्रो इंडियाने डस्ट बिन भेट दिले. या डस्ट बिनचे थेट शहरातील सर्व मिळकत धारकांसह शाळांना प्रत्येक वर्ग खोलीत 2 प्रमाणे वाटप सुरु करण्यात आले आहे.

वर्गीकरण करण्याचे आवाहन
मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले की, मोफत वाटप डस्ट बिनचा वापर करून नागरिकांनी नगरपरिषदेला शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे. कचरा वर्गीकरण करून नगरपरिषदेच्या घंटागाडीत देण्यास नागरिकांनी सहकार्य करावे. येथील पद्मावती रस्त्यालगतचे प्रभागात सर्व झोपडीधारकांना प्रत्येकी दोन डस्टबिनचे वाटप थेट घरांजवळ जाऊन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते वाटपास सुरुवात झाली. या प्रसंगी उपनगराध्यक्ष सागर भोसले, नगरसेविका सुनीता रंधवे, नागरिक उपस्थित होते. याबाबत एन्प्रो इंडियाचे अभिनंदन करण्यात आले. कंपनीचे प्रमुख श्रीकृष्ण करकरे, देवेंद्र देशपांडे यांनी विशेष सहकार्य केले. आळंदीत या कार्यक्रमातून कचरा वर्गणीकरण करण्याची जनजागृती होत आहे. यामुळे ओला व सुखा कचरा घंटागाडीतून मिळणार आहे. नागरिकांनी घंटागाडीत कचरा टाकण्यासह कचरा वर्गीकरण करून देण्यास आवाहन करण्यात आले आहे. आवाहन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी केले आहे.