प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे शहर स्वच्छ
आळंदीः आळंदी नगरपरिषदेने माऊलींचे पालखी सोहळ्याच्या प्रस्थान नियोजनात आरोग्य विभागाने जादा कामगारांचा वापर करून घेतला. त्यामुळे आषाढी यात्रेचे प्रस्थान झाल्यानंतर आळंदीत चकाचक अभियान राबवीले. दिवस-रात्र स्वच्छता करण्यासाठी विभाग निहाय केलेल्या नियोजनाने आळंदीत कचरा स्वच्छता तात्काळ करण्यात आली. यामुळे भाविकांसह नागरिकांनी येथील स्वच्छतेच्या कामकाजात समाधान व्यक्त केले. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांचे नियंत्रणात आषाढी यात्रेचे प्रशासनाने कामकाज केल्याने स्वच्छता कायम ठेवण्यात आळंदी नगरपरिषद प्रशासनास यश आल्याचे आरोग्य विभागाच्या मुकादम मालन पाटोळे यांनी सांगितले.
प्लास्टिकमुक्त अभियान यशस्वी
या स्वच्छता अभियानामध्ये नगरपरिषदेच्या शहर स्वच्छता ठेकेदारांचे ज्यादा कामगार आणि सेवाभावी संस्थाचे सहकार्य झाले. आळंदीत नगरपरिषदेच्या माध्यमातून प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर जनजागृतीची शहरात प्लास्टिकमुक्त आळंदी अभियान यशस्वी झाले. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत प्लास्टिकचा कचरा नगण्य मिळाला. थर्माकोल पत्रावळी व द्रोण यांचा वापर झाला नाही. यामुळे आळंदी प्लास्टिक मुक्त राहिली. यावर्षी संपर्क साधल्यास तात्काळ घंटागाडी पाठविण्यात आल्याने आळंदी चकाचक उपक्रमामुळे सुविधांबाबत गैरसोय झाली नाही. नगरपरिषदेच्या विविध खाते प्रामुख्याच्या नियोजनाप्रमाणे तयारीतील काम केल्याने स्वच्छता, पथदिवे, वीज आणि पाणी पुरवठा अखंडित राहिला. नेहमी मंदिर परिसरात भरून वाहणार्या कचरा कुंड्या यावर्षी मात्र नागरिकांना दिल्या नाहीत.
नियोजनामुळे कचरा नाही
मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले की, आळंदीमध्ये जंतुनाशकांची फवारणी, धुरीकरण सातत्याने करून प्रस्थानापुर्वी आरोग्याची काळजी घेण्यात आली. शहराचे 2 विभाग करून स्वच्छता करण्यात आली. केलेल्या नियोजनप्रमाणे काम करून घेण्यात आल्याने शहरात अगदी वर्दळीच्या ठिकाणी देखील कचरा राहिला नाही. आरोग्य विभाग प्रमुख मुकादम मालन पाटोळे यांनी नगरप रिषदेच्या कामगारांसह ठेकेदारांकडील सोयी सुविधा, जादा कामगार तसेच नगरपरिषदेची साधणारे यासाठी वापरण्यात आली. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या कामाचे प्रांत आयुष प्रसाद यांनी कौतुक केले. पुण्यातील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या युनिटने देखील आळंदी मंदिर भागात स्वच्छता केली. त्यामुळे आळंदी चकाचक अभियान यशस्वी झाले. येथील प्रस्थान काळात गोपाळ मोहरकर यांनी स्वच्छता विभाग व जादा कामगार यांचे माध्यमातून स्वच्छ आळंदी राहण्यास नियंत्रण ठेवत काम करून घेतल्याचे सांगितले.