आळंदी : येथील पुणे आळंदी रस्त्यावरील देहूफाटा चौका जवळील साई हॉस्पिटल समोर बस आणि दुचाकीत अपघात झाला.या दुर्दैवी अपघातात दुचाकी स्वार वारकरी युवक ठार झाला. घटना शुक्रवारी ( दि.11) दुपारी तीन च्या सुमारास आळंदी देहूफाट्या जवळ घडली. अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव कैलास काशिनाथ नाईक ( वय 24, रा. केळगाव रस्ता, आळंदी ) या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपघात पुणे आळंदी रस्त्यावर दुपारी तीनच्या सुमारास झाला. कैलास नाईक हा ऍक्टिव्हा दुचाकी वरुन जात होता. तो देहुफाटा चौकाच्या जवळ आला असता दुचाकी व बस मध्ये अपघात झाला. यात दुचाकी स्वराचे डोक्याला जबर मार लागला. जबर जखमी झाला. त्यास रुग्णालयात घेऊन गेल्या नंतर वैद्यकीय सूत्रांची मृत जाहीर केले. दिघी पोलीस तपास करत आहे.