स्थायी समिती सभापती वैजयंता उमरगेकर
आळंदी : आळंदी नगरपालिका विषय समिती सदस्य आणि सभापती,उपसभापती पदासाठी बिनविरोध निवडी झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा खेड चे तहसीलदार विठ्ठल जोशी यांनी जाहीर केले.
आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर,नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले सर्व नगरसेवक,नगरसेविका यावेळी उपस्थित होते. निवडणुकी नंतर सदस्यांंचा सत्कार करण्यात आला. निवडी जाहीर घोषणा करताच आळंदीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
पक्षीय बला नुसार निवडी
समिती सदस्य निवडी करण्यात आल्या.त्यानंतर सभापतीं व उपसभापती पदासाठी सादर प्रस्ताव प्रमाणे बिनविरोध निवडी झाल्याचे पीठासीन अधिकारी जोशी यांनी सांगितले.शिवसेना व भाजप तसेच अपक्ष यांच्यातील पक्षीय बला नुसार या निवडी करण्यात आल्या.भाजपचे वतीने गटनेते पांडुरंग वहिले, शिवसेनेच्या वतीने तुषार घुंडरे यांनी प्रस्ताव दिले.शिवसेनेचे गटनेते आदित्य घुंडरे यांनी तुषार घुंडरे यांचे गटनेते पदाचा हरकत अर्ज दिला .मात्र पीठासीन अधिकारी यांनी अर्ज फेटाळला .पक्षीय बलाबळानुसार भाजपचे प्रत्येक समितीत 3 आणि शिवसेने सह अपक्ष यामधून 2 सदस्य निवडीस वाव होता.मात्र सेनेकडून सर्व समितीत सदस्यांसाठी प्रस्ताव नसल्याने जागा मोकळ्या राहिल्या.
विषय समिती,सभापती व सदस्य
स्थायी समिती
सभापती पदसिद्ध नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,
सदस्य उपाध्यक्ष सागर भोसले,बालाजी कांबळे,पारुबाई तापकीर,मीरा पाचुंदे, पांडुरंग वहिले,सचिन गिलबिले.बांधकाम समिती सभापती पांडुरंग वहिले,सदस्य सचिन गिलबिले,प्रशांत कुर्हाडे.
यात्रा समिती
सभापती पारुबाई तापकीर,
सदस्य सागर बोरुंदीया,सागर भोसले,तुषार घुंडरे,प्रकाश कुर्हाडे.
पाणी पुरवठा समिती
पदसिद्ध उपनगराध्यक्ष सभापती सागर भोसले,
सदस्य बालाजी कांबळे,पांडुरंग वहिले,स्मिता रायकर,स्नेहल कुर्हाडे .
महिला व बाल कल्याण समिती
सभापती मीरा पाचुंदे,
उपसभापती प्रमिला रहाणे,सदस्य पारुबाई तापकीर,स्नेहल कुर्हाडे.
मागासवर्गीय कल्याणकारी समिती
सभापती बालाजी कांबळे,
सदस्य सागर बोरुंदीया,प्रमिला रहाणे.
शालेय शिक्षण,क्रीडा व सांस्कृतिक समिती
सभापती सचिन गिलबिले,
सदस्य मीरा पाचुंदे,शैला तापकीर,प्रशांत कुर्हाडे,तुषार घुंडरे