आळंदी मंदिरात मोफत आरोग्य शिबिर

0

आळंदी : श्री शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी मंदीरातील पुरातन श्री सिध्देश्‍वर महाराज मंदिरात महारूद्राभिषेक आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी यावेळी आरोग्य तपासणी करून घेतली. पिंपरी येथील डॉ. डि. वाय. पाटील ट्रस्टच्यावतीने शिबिरामध्ये तपासणी केली. मोफत आरोग्य सल्ला, सेवा आणि तपासणी करण्यात आली. याप्रसंगी आनंद वाहिनीचे रविंद्र येळवंडे, तुकाराम रसाळ, कृष्णा भारद्वाज, वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव नाना महाराज चंदिले, व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते.