जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील 35 वर्षीय तरुणाने गुरुवारी गळफास लावून आत्महत्या केली. प्रमोद भागवत पाटील (35, रा.आव्हाणे, ता.जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.
तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
प्रमोद पाटील यांनी राहत्या घरी गुरुवारी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.भंगाळे यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहेत.