आव्हाण्यातील 21 वर्षीय तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील 31 वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना गुरूवार, 6 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अमोल छगन सपकाळे (31) असे मयत तरुणाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आई व भावासह वास्तव्यास असलेला अमोलने गुरुवारी रात्री नऊ वाजता आईला गावाला जावून येतो म्हणून घराबाहेर पाय काढला मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाहीच. आव्हाणे शिवारातील रेल्वे खांबा क्रमांक 300/ 37 ते 326 या दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी जळगाव स्टेशन मास्तर यांच्या खबरीवरून तालुका पोलिसात नोंद करण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशील पाटील आणि दीपक कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शुक्रवार, 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास सुशील पाटील व दीपक कोळी करीत आहे.