आशिया कपमध्ये आज भारताचा पाकिस्तानशी सामना

0

मुंबई : आशिया कपमध्ये आज क्रिकेट चाहत्यांना एक सुपरहिट सामना पाहायला मिळणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान संघ आज एकमेकांशी भिडणार आहेत.आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत ११ वेळा सामना झाला असून भारतानं सहा वेळा तर पाकिस्ताननं ४ वेळा विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असून या सामन्याचं दडपण दोन्ही संघावर असल्याचं मत पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज खान यानं व्यक्त केलं आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आशिया चषक स्पर्धेत झालेल्या थरारक लढतींमध्ये बहुतेकवेळा भारतानंच बाजी मारली आहे.

ठिकाण व वेळ

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हा सामना दुबईमध्ये खेळला जाणार असून भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार आहे. स्टार स्पोर्ट्स 1/HD आणि स्टार स्पोर्ट्स सेलेक्ट 1/HD वर तुम्ही हा सामना पाहू शकता.