आशिया चषकासाठी समालोचकांची यादी जाहीर

0

नवी दिल्ली-१५ सप्टेंबरपासून युएईत पार पडल्या जाणाऱ्या आशिया चषकासाठी समालोचकांची यादी आशियाई क्रिकेट परिषदेने जाहीर केली आहे. मात्र या यादीत समालोचनात नावाजलेले नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षा भागले यांना स्थान देण्यात आलेले नाही. याचसोबत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनाही या यादीमध्ये स्थान नाही.

यांचा आहे समावेश

भारत – सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (लक्ष्मण उपलब्ध होत नसल्यास झहीर खान)

पाकिस्तान – रमिझ राजा, आमिर सोहेल

श्रीलंका – कुमार संगकारा, रसेल अर्नोल्ड

बांगलादेश – अथर अली खान

पाहुणे समालोचक – डीन जोन्स, ब्रेट ली, केविन पिटरसन